संजय राठोड सर्व मंत्र्यांच्या संपर्कात, ते माध्यमांसमोर येतील – शंभूराज देसाई

shambhuraj desai

कराड : राज्यात सद्या पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आहे. वनमंत्री संजय राठोड यांचे या प्रकरणाशी संबध असल्याचे आरोप होत असल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या संबंधित कथित ऑडिओ क्लिप्स देखील व्हायरल झाल्याने हे प्रकरण अधिकच गूढ होत चाललं आहे. तर, पूजाला न्याय मिळावा अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे.

गेल्या १२ दिवसांपासून वनमंत्री संजय राठोड हे गायब आहेत. या आरोपांवर त्यांनी अद्याप कोणत्याही प्रकारचा खुलासा न केल्याने संशय अधिक बळावत असल्याचा आरोप भाजप कडून केला जात आहे.या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ऐन थंडीत चांगलेच तापलेले आहे. संजय राठोड यांनी मात्र अद्यापही या विषयावर मौन बाळगलं असून त्यांचं नाव समोर आल्यापासून यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

राठोड गेल्या काही दिवसांपासून गायब असून त्यांचा फोनही लागत नाही. मंत्रिमंडळाची 17 फेब्रुवारी रोजी बैठक झाली या बैठकीला राठोड यांनी दांडी मारली. मात्र, ते इतर नेत्यांच्या संपर्कात असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं होतं.

आता, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी देखील संजय राठोड हे संपर्कात असल्याचं सांगितलं आहे. ‘संजय राठोड हे सर्व मंत्र्यांच्या संपर्कात आहेत. योग्य वेळ येताच ते माध्यमांसमोर येतील,’ असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे संजय राठोड हे नेमकं कधी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करणार याबाबत राजकीय क्षेत्रासह त्यांच्या समर्थकांमध्ये देखील उत्सुकता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या