आदित्यच्या वक्तव्याला संजय राऊतांचं अनुमोदन ; शिवसेना वर्षभरात सत्तेच्या बाहेर ?

उद्धव ठाकरे , आदित्य ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा: गेल्या अनेक दिवसांपासून सत्तेतला लाथ मारण्याचा मानस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलून दाखवत आहेत पण त्याला काही मुहूर्त लागत नाही. मात्र, युवसेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी एका वर्षात सत्तेतला लाथ मारू अस वक्तव्य करून शिवसेनेच्या सत्तेतून बाहेर पडण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा हवा दिली आहे. आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्याला संजय राऊतांने अनुमोदन दिले आहे.

आदित्य ठाकरे कालच्या मेळाव्यात जे काही बोलले त्या गोष्टी यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडण्यात आल्या आहेत. संपूर्ण पक्षाची हीच भावना आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंधात दुरावा आल्याची बाब सगळ्यांनाच माहिती आहे. शिवसेना सध्या राज्यातील सत्तेत वाटेकरी असली तरी सरकार मात्र आमचे नसल्याची भावना संजय राऊत यांनी बोलून दाखवली आहे.

दरम्यान, काल आदित्य ठाकरेंनी “या वर्षभरात शिवसेना सत्तेला लाथ मारू शकेल. त्यानंतर आम्ही स्वबळावर सत्तेत येऊ. मात्र, याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. सरकारमधून बाहेर पडण्याचा मुहूर्त निश्चित झाल्यानंतर सगळ्यांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. अपेक्षित परिवर्तन घडवण्यासाठी शिवसेनेला एकहाती सत्ता द्या”, अस वक्तव्य केल होत .