fbpx

दारूबंदीचा ठराव ग्रामसभेत होतो तर प्रशासन अंमलबजावणी का करत नाही?-संजय पाचंगे

शिरूर/ प्रमोद लांडे: शिरूर तालुक्यातील 93 गावांपैकी 93 गावात दारूबंदीचा ठराव मंजूर झालेला असताना बऱ्याचशा गावांमध्ये अवैधरित्या दारू विक्री चालू आहे. दारूबंदी जर ग्रामसभेत ठराव होतो तर मग प्रशासन त्याची अंमलबजावणी का करत नाही? असा सवाल करत क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी बेमुदत आंदोलनाला आजपासून सुरुवात केली आहे.

पुणे जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग,जिल्हा उप अधिक्षक,राज्य उत्पादन शुल्क दौंड विभाग यांच्याशी काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाली असता प्रशासनाने सकारात्मक भूमिका मांडत ठोस पाऊल उचलू असे आश्वासन दिले. प्रशासनाला ठोस पाऊले व जबाबदारी निश्चित करा अन्यथा तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे असा इशारा पाचंगे यांनी दिला आहे.