MNS का एक गुंडा आज फिर पिटा ! संजय निरुपम यांच्या उलट्या बोंबा

मुंबई: संजय निरुपम आणि मनसेचा संघर्ष आता टोकाला पोहचला आहे. काल घाटकोपरमध्ये संजय निरुपम हे सभा घेणार होते. मात्र सभा ठिकाणी निरुपम यांचे आगमन होताच काही मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सभा उधळून लावली तसेच खुर्च्याही भिरकावून फेकल्या. पण संजय निरुपम या घटनेचे खंडन करत गुजरात मधून परत आल्यावर सभा घेणार असल्याचा इशारा सुधा संजय निरुपम यांनी दिला आहे.

संजय निरुपम यांनी ट्विट करून “मनसेच्या गुंडाला आज परत मारले माझी सभा संपल्यानंतर स्टेज वर येऊन घोषणाबाजी करणाऱ्या मनसेच्या गुंडाला स्थानीक लोकांनी चोप दिला आणि नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. गुजरात वरून परत आल्यावर पुन्हा सभा घेईल” अशा आशयाच ट्विट संजय निरुपम यांनी केलं आहे.

You might also like
Comments
Loading...