fbpx

संजय निरुपमांची गच्छंती अटळ ? पुढील महिन्यात राहुल गांधी घेणार निर्णय

sanjay-nirupam

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद संजय निरूपम यांच्याकडून काढून घ्या, अशी मागणी करत काँग्रेसचे अनेक नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. नसीम खान, एकनाथ गायकवाड, कृपाशंकर सिंग यांच्यासह इतर मुंबईतील इतर काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली आहे.

‘निरूपम यांना हटवा आणि काँग्रेस मजबूत करा. त्यांच्याजागी मिलींद देवरा यांना अध्यक्ष करा,’ अशी मागणी दिल्ली भेटीत काँग्रेस नेत्यांनी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातून मुंबई काँग्रेसमध्ये निरूपम यांच्याविषयी असलेली प्रचंड नाराजी दिसून येते.

दरम्यान, मुंबई काँग्रेस नेत्यांनी घेतलेल्या भेटीनंतर हायकमांडकडून त्यांना आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत जानेवारी महिन्यात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असं आश्वासन या नेत्यांना मिळालं आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे निरुपमांबाबत मोठा निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.