फेरीवाल्यांच्या पोटाचा विचार करा – संजय निरुपम

फेरीवाल्यांवर होणा-या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारच

टीम महाराष्ट्र देशा – सध्या मुंबईत फेरीवाल्यांच्या मुद्यावरुन जोरदार राजकारण सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फेरीवाल्यांच्या विरोधात तर काँग्रेसने फेरीवाल्याच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी बुधवारी पुन्हा एकदा फेरीवाल्यांची बाजू उचलून धरली. फेरीवाल्यांच्या पोटाचा विचार करण्याचे त्यांनी आवाहन केले.

50 वर्ष जुन्या फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यास त्यांनी सांगितले. पोलीस, महापालिकेच्या कारवाईविरुद्ध आवाज उठवणारचं असे त्यांनी सांगितले. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेने रेल्वे स्थानक परिसरात बसणा-या फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाणे आणि मुंबईतील विविध रेल्वे स्थानकत मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंसक आंदोलन करुन फेरीवाल्यांना पळवून लावले होते. त्यामुळेच दादरसह मुंबईतील काही रेल्वे स्थानकांनी सध्या मोकळा श्वास घेतला आहे.

 

You might also like
Comments
Loading...