संजय निरूपम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावरुन दूर करण्यासाठी काँग्रेसचे काही नेते काल मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटले होते.तर दुसऱ्या बाजूला निरुपम यांनी आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

दरम्यान, ओबीसी बांधवांच्या समस्या घेऊन मी मुख्यमंत्र्यांना भेटलो असल्याचे निरूपम यांच्याकडून सांगण्यात आले असले तरी, काँग्रेसवर दबाव टाकण्यासाठी निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.भेटीनंतर निरुपम समर्थकांनी ‘निरुपम आगे बढो’च्या घोषणाही दिल्या.

मी राहुल गांधींशी एकनिष्ठ आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी माझी निवड ही राहुल गांधींनीच केली. तसेच मुंबईत जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याचा आदेशही मला राहुल गांधींनीच दिल्याचे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.