फडणवीस कारवाई करा अन्यथा मनसेला ‘करारा जवाब मिलेगा’

संजय निरुपम यांचे मनसेला प्रतिउत्तर

टीम महाराष्ट्र देशा – आमच्या कार्यालयापासून आझाद मैदान पोलिस स्थानक अवघ्या २५ मीटर अंतरावर आहे. मात्र तरीही हा हल्ला झाला आहे.  मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांविरोधात कठोर कारवाई केली नाही तर मनसेला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा निरुपम यांनी दिला आहे. मनसेचे कार्यकर्ते फेरीवाल्यांकडून मार खात असल्याने त्यांच्यामध्ये तणावाची परिस्‍थिती आली आहे. त्यामुळे त्यांनी असा भ्याड हल्ला केल्याचा पलटवार निरुपम यांनी केला आहे.

मनसेच्या नपुसंक कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात कोणी नसताना भ्याड हल्ला केला आहे. या मनसेच्या हल्ल्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मनसे विरुध्द निरुपम हा वाद आणखी चिघळण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.