मनसे कायद्याचं पालन करत नाही, त्यांना महाआघाडीत घेण्याचा प्रश्नच नाही : निरूपम

मनसेकडे मतं आहेत का ? : निरूपम

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेसने महाआघाडीमध्ये मनसेला घेण्याचा प्रस्ताव काँग्रेस पक्षासमोर ठेवला आहे. पण काँग्रेसने याला तीव्र विरोध दर्शवला असल्याची माहिती काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी दिली आहे. मनसे कायद्याचं पालन करत नाही, हिंसेचं राजकारण करतातत्यामुळे मनसे महाआघाडीचा भाग नसेल, असं निरुपमांनी स्पष्ट केलंय.

नेमकं काय म्हटलं आहे संजय निरूपम यांनी ?

महाआघाडीमध्ये मनसेचा समावेश करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रस्ताव आला आहे, पण या प्रस्तावाला काँग्रेसचा केंद्रीय आणि राज्य स्तरावर विरोध आहे,मनसे आणि आमची विचारधारा जुळत नाही. मनसे कायद्याचं पालन करत नाही, हिंसेचं राजकारण करतात. २०१४ च्या निवडणूकीत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता, आताही त्यांनी मोदींना पाठिंबा द्यायला हवा, भाजपाचे आणि त्यांचे जवळचे संबंध आहेत, असंही निरुपम म्हणाले. मनसेकडे मतं आहेत, का, असतील तर ते त्यांना लाभो, असं म्हणत मनसे महाआघाडीचा भाग होणार नाही.