भाजपचे ‘जिन्ना’वर प्रेम होते आणि ते राहील – संजय निरुपम

टीम महाराष्ट्र देशा : भाजपच्याच खासदार असलेल्या साध्वी सावित्रीबाई फुले यांनी मोहम्मद अली जीना हे महापुरुषच होते म्हणत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

जीना हे महापुरुषच होते, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान होते, असे त्यांनी म्हटले आहे.जीना वादावार गुरुवारी भाजपा खासदार साध्वी सावित्रीबाई फुले यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, जीना हे महापुरुष होते आणि यापुढेही असतील. अशा महापुरुषाचे छायाचित्र आवश्यक असेल तिथे लावलेच पाहिजे.

या विधानाचा कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपचे जिन्ना वर प्रेम होते आणि राहील तर अडवाणी, श्यामा प्रसाद मुखर्जी, जसवंत सिंह यांनी जीन्नाचे उदात्तीकरण केल असल्याचा घणाघात निरुपम यांनी भाजपवर केला आहे.

जिन्ना से #BJP को प्यार था,है और रहेगा। अडवाणीजी जिन्ना के मज़ार पर मत्था टेकने गए थे। जसवंत सिंह ने अपनी किताब में जिन्ना की जयजयकार की। श्यामा प्रसाद जी जिन्ना की मुस्लिम लीग सरकार में मंत्री थे। अब मोदीजी की सांसद जिन्ना को भारतीय स्वतंत्रता सेनानी और महापुरुष बता रही हैं। अशा आशयाचे ट्विट करत संजय निरुपण यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.