‘बहिरा नाचे आपन ताल!’, संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला

राज ठाकरे

मुंबई – महाराष्ट्रात कोरोना वाढण्यास स्थलांतरित जबाबदार असल्याचं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी निशाणा साधला आहे. ‘बहिरा नाचे आपन ताल!’ म्हणजे ‘बहिरी व्यक्ती स्वतःच्याच तालावर नाचते’ अशा अर्थाची टीका निरुपम यांनी केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परप्रांतीयविरोधी धोरण सर्वश्रुत आहे.मुंबईतील वाढत्या समस्यांना परप्रांतीय जबाबदार असल्याचा दावा राज ठाकरे सुरुवातीपासूनच करत आले आहेत. राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी पुन्हा परप्रांतीयविरोधी सूर आवळला.

दरम्यान, ‘परप्रांतीय जात असताना त्यांची मोजणी आणि चाचणी करण्यासंबंधी मी सूचना केली होती. पण असल्या कोणत्याही चाचण्या करण्यात आल्या नाहीत. येत असलेली माणसं मोजलीही नाहीत. त्यामुळे कोण येतंय ,कोण जातंय याचा थांगपत्ता लागणार नसेल तर आज करोना आहे उद्या दुसरं काही असेल. हे दुष्टचक्र थांबणार नाही. आपण बंधन धालत नाही आहोत. हे चित्र चांगलं नाही. त्यामध्ये सर्वांची वाताहत होत आहे,’ अशी टीका राज ठाकरेंनी केली.

राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर संजय निरुपम यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरवर फोटो शेअर केला असून ‘बहिरा नाचे आपन ताल!’ म्हणजे ‘बहिरी व्यक्ती स्वतःच्याच तालावर नाचते’ अशा अर्थाची टीका निरुपम यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या