“आता विनंती नव्हे, युद्ध होईल. संघर्ष अत्यंत भीषण होईल-निरुपम

sanjay-nirupam

मुंबई : “आता विनंती नव्हे, युद्ध होईल. संघर्ष अत्यंत भीषण होईल आणि संघर्ष व्हायलाच हवा. उत्तर देण्याचा अधिकार फेरावाल्यांनाही आहे तसेच “जैसी करनी, वैसी भरनी”, असे म्हणत संजय निरुपम यांनी मनसेवर पलटवार केला आहे.मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचं काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी थेट समर्थन केले आहे.

काय म्हणाले निरुपण ?

“आता विनंती नव्हे, युद्ध होईल. संघर्ष अत्यंत भीषण होईल आणि संघर्ष व्हायलाच हवा. उत्तर देण्याचा अधिकार फेरावाल्यांनाही आहे.”, असे निरुपम म्हणाले. शिवाय, “2014 साली बनलेला फेरीवाला संरक्षण कायदा लागू व्हायला हवा. मात्र अनेक जणांना वाटतं की, तो कायदा लागू होऊ नये. मुख्यमंत्र्यांनी बांगड्या भरल्यात आणि सरकार झोपलं आहे.”, असा घणाघातही संजय निरुपम यांनी केला.शिवसेनेला संपवण्यासाठी भाजप मनसेला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप संजय निरुपम करताना “काय कायदेशीर आणि काय बेकायदेशीर, हे ठरवण्याचा मनसेला अधिकार नाही. ज्यावेळी फेरीवाल्यांना मारहाण होत होती, त्यावेळी पोलीस गप्प बसले होते. यापुढेही फेरीवाले असेच करतील.”, असे संजय निरुपम म्हणाले.