आधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम

sanjay nirupam & raj thackeray

मुंबई – उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारणाऱ्या मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. मनसेकडून उत्तर भारतीयांना होणारी मारहाण आणि त्यांना देण्यात येणाऱ्या हीनतेच्या वागणुकीप्रकरणी राज ठाकरे यांनी माफी मागितली पाहिजे, असे निरुपम यांनी म्हटले आहे.

परप्रांतीयांचे लोंढे, त्यामुळे सोयी-सुविधांवर पडणारा ताण, फेरीवाल्यांच्या समस्या यावरुन मनसे प्रमुख राज ठाकरेंनी अनेकदा उत्तर भारतीयांवर टीकास्त्र सोडलं आहे. मनसे स्टाईल राड्याचा फटका आतापर्यंत अनेकदा उत्तर भारतीयांना बसला आहे. मात्र आता राज ठाकरे चक्क उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहेत. त्यामुळे परप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नेमकं काय म्हणाले संजय निरुपम?
‘राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यापूर्वी त्यांनी माफी मागितली पाहिजे. मनसेकडून उत्तर भारतीयांना मारहाण होत असते. तसेच त्यांना हीनतेची वागणुकही दिली जात असते, त्यामुळे या प्रकारांसाठी राज ठाकरे यांनी माफी मागावी. त्यांनी माफी मागितल्यास उत्तर भारतीय समाज त्यांनी मोठ्या मनाने स्वीकारेल’.