भाजपाने घाबरून मला नजरकैदेत ठवले- संजय निरुपम

sanjay-nirupam

मुंबई: भाजप अध्यक्ष अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला आहे. कॉंग्रेसकडून अमित शाह यांना घेराव घालण्यात येईल या भीतीने पोलिसांनी नजरकैदेत टाकल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला आहे.

भाजपकडून ‘संपर्क फॉर समर्थन’ हे अभियान हाती घेतले आहे. त्यामुळे भाजप अध्यक्ष अमित शहा अनेक राजकीय नेत्यांना, कलाकारांना भेटत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत अमित शहा उद्धव ठाकरे यांच्यासह रतन टाटा, लता मंगेशकर, माधुरी दीक्षित यांची भेट घेणार आहेत. याअंतर्गत शहा यांनी आधीच बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांची भेट घेतली होती. गुरुवारी ते अकाली दलाच्या नेत्यांना भेटणार आहेत.