कुरिअर बॉम्बस्फोटामधील जखमींना संजय नहार करणार मदत

टीम महाराष्ट्र देशा : कुरिअर पार्सल बॉम्बस्फोटामध्ये ज्या संजय नहार यांच्या नावाने पार्सल आले होते त्यांनी नगरमध्ये येऊन या स्फोटातील जखमींची विचारपूस केली आहे. इतकंच नाही तर, या घटनेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत त्यांनी खर्चाबाबत जखमींना आर्थिक मदतीची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.

नगरच्या आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये या स्फोटातील जखमी ‘मारुती कुरिअर एजन्सी’चे कर्मचारी संदीप भुजबळ आणि कर्मचारी संजय क्षीरसागर हे दोघे उपचार घेत आहेत. या प्रकरणात एटीएसने तपास केल्यानंतर त्यांची परवानगी घेऊन संजय नहार आज नगरला आले होते.