कोकण पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेची उडी; संजय मोरे यांना उमेदवारी जाहीर

मुंबई : पालघर पोटनिवडणुकीतील पराभव जिव्हारी लागलेल्या शिवसेनेने आता भाजपची कोंडी करण्यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.शिवसेनेकडून ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना उमेदवारी देण्यात आलीये.

दरम्यान आता भाजपसमोरील अडचणी वाढल्या असून, नुकतेच राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले निरंजन डावखरे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादीकडून नजिब मुल्ला यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे आता ही निवडणूक तिरंगी होणार आहे. दरम्यान शिवसेनेने भाजपचे निरंजन डावखरे यांच्या विरोधात कोकण पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उभा केल्याने भाजपच्या विजयाचा मार्ग खडतर बनला आहे.

You might also like
Comments
Loading...