fbpx

संजय मोरे हे पदवीधरांचे हक्काचे आमदार होणार, खा. श्रीकांत शिंदे यांना ठाम विश्वास

कल्याण – कोकण पदवीधर मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आता अंतिम टप्यात आल्या असताना सर्वच भागात प्रचाराचा जोर प्रचंड वाढला आहे. ठिक-ठिकाणी बैठका, भेटी-गाठी चालू आहेत. अतिशय अटीतटीच्या लढतीमुळे सर्वांचे लक्ष या मतदारसंघावर खिळले आहे. कल्याण शहर शाखा आयोजित पदवीधरांचा मेळावा काल कल्याणमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार संजय मोरे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार रुपेश म्हात्रे, आमदार शांताराम मोरे आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला.

बेरोजगारी सहित विविध प्रश्न आ वासून उभे असताना विद्यमान आमदार कधी आपल्यासमोर आपल्या भेटीला आल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाहीत. ज्या पक्षाने भरभरून दिले त्या पक्षाच्या पाठीत खंबीर खुपसून स्वार्थासाठी सवता सुभा मांडणाऱ्याना ,जनता धडा शिकवेलच. चळवळीतून पुढे आलेले संजय मोरे हे नक्कीच आपल्या सर्व पदवीधरांसाठी हक्काचा आवाज बनतील, असे मत कल्याणचे युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करताना मांडले.

यावेळी बोलताना सेनेचे कोकण पदवीधरचे उमेदवार संजय मोरे म्हणाले , मी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला असून, माझ्यावर मतदारांनी दाखवलेले प्रेम अभूतपूर्व आहे. त्यामुळेच मला विजयाची पक्की खात्री आहे. यावेळी माजी महापौर राजेंद्र देवळेकर, शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, अरविंद मोरे, रवी पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षक, पदवीधर मतदारांनो या बाबींकडे लक्ष द्या नाहीतर तुमचं मत होऊ शकत बाद..!