मोठ्या समाजाची भावना दुखावत असेल तर त्यांच्याशी थेट चर्चा करा -उद्धव ठाकरे

संजय भंसाळींची उद्धव ठाकरेंबरोबर फोनवरून चर्चा

मुंबई- मोठ्या समाजाची भावना दुखावत असेल तर त्यांच्याशी थेट चर्चा केली पाहिजे,तसेच राणी पद्मावती ही सर्व हिंदूसाठी आदर्श असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्माता दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांना सुनावलं आहे.

राणी पद्मिनीचे चरित्र चुकीच्या पद्धतीने पडद्यावर दाखवल्याचा आरोप करीत देशभरातील राजपूत आणि हिंदू संघटनांनी संजय लीला भंसाळी यांच्या पद्मावतीला विरोध केला आहे. त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे. या पार्श्वभूीवर संजय लीला भंसाळी यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भंसाळी आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचे मान्य करीत सांगितले की, संजय लिला भंसाळी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. चित्रपटासंबंधी वाद झाले की अनेक जण अनेकजण मातोश्रीवर मदतीची मागणी करतात. भंसाळींनीही तसेच केले. या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी भंसाळींना सुनावताना सांगितले की, तुम्ही उत्तम सिनेमा बनवता परंतु सिनेमामुळे एखाद्या मोठ्या समाजाची भावना जर दुखावत असेल तर त्यांच्याशी थेट चर्चा केली पाहिजे. जे मध्यस्थ असतात ते याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करीत असतात, त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. दुसरीकडे या वादाचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. तसा प्रयत्न करणे चुकीचे आहे. सिनेमाबद्दल जे आक्षेप आहेत ते फक्त रजपूत समाजाचे नसून हिंदू समाजाचे आहेत.अशावेळी या समाजातील सर्व नेत्यांनी सर्व प्रथम आधी सिनेमा पहावा आणि नंतर चित्रपटाला विरोध करावा अशी चर्चा झाल्याचं राऊत यांनी सांगितले

You might also like
Comments
Loading...