बापूंच्या मुलाला ‘नानां’चा आधार ; संजय काकडेंची जावयाला ‘रसद’

टीम महाराष्ट्र देशा: सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचे जावाई रोहन देखमुख यांच्या एका शब्दावरून संजय काकडेंनी आपल्या खासदार निधीतून जवळपास 45 लाख रुपये तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर केले आहेत. जावई रोहन यांचे राजकारण सोपे व्हावे, यासाठी सासऱ्यांकडून ‘रसद’ पुरविण्यास सुरुवात झाली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.

संजय काकडे यांचे जावई रोहन देशमुख यांनी 2014 मध्ये उस्मानाबाद मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे आता आगामी निवडणुकीसाठी रोहन यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात जोरात काम सुरू केले आहे.सोलापूरचे रहिवासी असूनही ते जास्तीत-जास्त वेळ उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना व लोकांच्या कामांना देत असल्याचं दिसून येत आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात तुळजापूर विधानसभा मतदारसंघ आहे. याठिकाणहून पूर्वी सहकारमंत्री देशमुख यांनी निवडणूक लढविली होती. यामध्येही त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर या मतदारसंघातून आता त्यांचे पुत्र रोहन यांनी तयारी सुरू केल्याचे खासदार संजय काकडे यांनी दिलेल्या निधीवरुन दिसून येत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का