fbpx

भाजप पक्ष स्वतः घरी येवून तिकीट देईल असा संजय काकडे यांना ठाम विश्वास

टीम महाराष्ट्र देशा : देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे तर राज्यामध्ये कोणाला कोठून उमेदवारीचं तिकीट द्यायचं यावर चर्चा रंगताना दिसत आहेत. पुण्यामधले भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांना भाजप कडून लोकसभेची निवडणुकी लढवण्याची इच्छा आहे पण भाजप मात्र त्यांना उमेदवारीचे तिकीट देण्यास काहीशी टाळाटाळ करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय काकडे यांनी एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलताना ७०% पुणेकर माझा बरोबर आहेत त्यामुळे भाजप पक्ष स्वतः घरी येवून मला तिकीट देईल असा ठाम विश्वास व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय काकडे भाजप विरोधात अनेक वक्तव्य करत आहेत. पण तरी देखील संजय काकडे यांना आपल्याला भाजप पक्ष घरी येवून पक्षाच्या उमेदवारीचे तिकीट देईल असा विश्वास वाटत आहे. प्रत्यक्ष पाहता संजय काकडे यांचे पुण्याच्या स्थानिक राजकारणात चांगलेच वर्चस्व आहे. त्यामुळे पुणेकर हे माझ्या बाजूने आहेत असे संजय काकडे ठाम पणे म्हणत आहेत.

दरम्यान संजय काकडे उमेदवारीचा दावा करत असले तरी भाजपमधून मोठा विरोध आहे. विशेषतः पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचा काकडे यांना कडाडून विरोध आहे. तसेच मध्यंतरी काकडे यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात वक्तव्य केली होती त्यामुळे भाजपकडून संजय काकडेंन बाबत नाराजी आहे.