‘फडणविसांना चांगल वाटावं म्हणूनचं संजय काकडेंनी पंकजा मुंडेंवर आरोप केले’

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पंकाजा मुंडे यांच्याबाबत रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी जातीपातीचे राजकारण केल्याने त्यांचा पराभव झाला. तर स्वतःच्या पराभवाचे खापर दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत आहेत, असे आरोप संजय काकडे यांनी केले आहेत. यावर पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी काकडे यांना टोला लगावला आहे.

एकदा पराभव झाला म्हणून तुम्ही मुंडेच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेता का, असा सवाल केला. फडणविसांना चांगल वाटावं म्हणून तुम्ही पंकजाविषयी असे बोलता, असा आरोपही त्यांनी केला आहे. संजय काकडे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे राजकीय संबंध असल्याने महाजन यांनी काकडे यांना टोला लगावला आहे.

दरम्यान एक वृत्तवाहिनीशी बोलताना संजय काकडे यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ज्यांना मतदारसंघ सांभाळता आला नाही, ते महाराष्ट्रात फिरुन काय दिवे लावणार, अशी टीका काकडे यांनी केली होती. पंकजा यांची विधाने भाजपच्या खऱ्या कार्यकर्त्याला दुखावणारी आहेत. पाच वर्षे तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्हाला काही काम करता आलं नाही. मग महाराष्ट्रात फिरुन तुम्ही काय दिवे लावणार, असा सवाल काकडे यांनी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या