लोकसभा निवडणूक तर नक्कीच लढणार – खा. संजय काकडे

आता पुढच्यादाराने जायचं!

पुणे: आगामी लोकसभा निवडणूक आपण पुण्यातून नक्कीच लढणार असल्याचा ठाम विश्वास राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलते होते. संजय काकडे यांनी स्वतःच आपण लोकसभेच्या रिंगणात असल्याचे जाहीर केल्याने आता निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये कलगीतुरा रंगणार हे मात्र नक्की.

संजय काकडे हे सध्या भाजपचे राज्यसभेतील सहयोगी सदस्य आहेत. मागील वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत काकडे यांनी चमत्कार करत भाजपला सत्तास्थानी आणले. त्यानंतर काकडे यांच्यावर मुख्यमंत्री देखील खुश असल्याचे दिसत आहेत. दरम्यान मध्यंतरी खासदार अनिल शिरोळे आणि काकडे यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे एकेकाळचे पुण्याचे किंगमेकर समजले जाणारे सुरेश कलमाडी यांच्याशी देखील काकडे यांची बैठक झाली होती.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आपण आजवर पक्षासाठी केलेले काम पाहता पक्ष नक्कीच आपला विचार करेल असा विश्वास देखील काकडे बोलून दाखवत आहेत. त्यामुळे आता अनिल शिरोळेना डावलून भाजप संजय काकडेंना उमेदवारी देणार का ? हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

Shivjal