भाजपाने राम मंदिराचा मुद्दा सोडून आता विकासावर लढावे,भाजप खासदार काकडेंचा घरचा आहेर

sanjay-kakde

पुणे : मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस ने बहुमताकडे वाटचाल केलेली आहे, त्यानंतर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिकिया येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये भाजपचे सहयोगी खा. संजय काकडे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला असून तिन्ही राज्यात सत्ता जाणार हे माहीत होत असं काकडे म्हणाले, तसेच मोदी आणि शहा यांनी आता राम मंदिराचा मुद्दा सोडून विकासावर भर द्यावे असेही तर म्हणाले.

राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत भाजपची सत्ता जाणार हे ठाऊक होतं मात्र मध्य प्रदेशमधेही सत्ता जात असेल तर ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. या राज्यांत लोकसभेच्या ६५ जागा असल्याने भाजपसाठी ही धोक्याची घंटा असल्याचं काकडे म्हणाले. तसेच पंतप्रधान मोदी आणि शहा यांनी मंदिर – मशीद, नामांतर या सारख्या विषयांना बाजूला ठेवून विकासावर भर देणं गरजेचं असल्याचे मत काकडे यांनी व्यक्त केले आहे.