fbpx

अजित पवारांनी स्व. गोपीनाथ मुंडेंवर लाठी हल्ला केला होता : संजय काकडे

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ‘अजित पवारांनी सत्तेत असताना सत्तेचा गैरवापर केला. त्यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर सत्तेत असताना आंदोलनादरम्यान लाठी हल्ला केला. मावळमध्येही त्यांनीच शेतकऱ्यांवर गोळीबार केला अस काकडे म्हणाले आहेत.

अजित पवार यांनी भाजपवर केलेल्या टीकेविषयी बोलताना त्यांनी भाजपने सत्तेचा कोणताही दुरुपयोग केला नाही. तसेच, भाजपने कुणावरही कोणताही हल्ला केला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक घरं फोडली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर पक्षातील नेत्यांना आयात करुनच वाढला आहे असही काकडे पुढे बोलताना म्हणाले आहेत.

दरम्यान, यापूर्वी अनेक वेळा विरोधीपक्षातील नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केलेला आहे. परंतु अद्याप अशा प्रकारचे आरोप सिद्ध झालेले नाहीत.