माझे भाकीत चुकलेच नाही; मोदींचा करिष्मा ओळखायला चुकलो – संजय काकडे

sanjay kakde

पुणे: मी केलेलं भाकीत खोटे ठरलेच नसून मोदींचा करिष्मा झाला तर आम्ही निवडून येऊ हेच म्हंटल होत, तेच चित्र गुजरातमध्ये पहायला मिळाल आहे. गुजरातचा विजय हा भाजपचा नसून केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चमत्कार ओळखायला चुकलो असल्याचं म्हणत भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आपण केलेलं भाकीत बरोबरच असल्याचं म्हणत स्वतःची पाठराखण केली आहे. चार दिवसांपूर्वी गुजरातमध्ये भाजपचा विजय बिकट असल्याचं काकडे म्हणाले होते. त्यांनतर महाराष्ट्र तसेच देशातही या वक्तव्याने मोठी खळबळ झाली होती.

गुजरातमध्ये सर्व गोष्टी भाजपच्या विरोधात असताना असा विजय मिळाल्याने अत्यंत आनंद झाला आहे. या विजयाने मोदी हे नेहरू आणि गांधी घराण्याच्या पुढे गेले असल्याचंही काकडे म्हणाले आहेत.

दरम्यान, संजय काकडे यांच्या वक्तव्याने नाराज असलेल्या काही भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. यावर बोलताना पक्षाकडून अद्याप आपल्याला कोणत्याच गोष्टीच बोलणं झालं नसल्याचं त्यांनी सांगितले आहे.