म्हणूनच मोदींच्या कार्यक्रमाला मी गैरहजर – खा काकडे

sanjay-kakde

पुणे: पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे आमंत्रण नसल्याने मंगळवारी झालेल्या मेट्रो भूमिपूजनाला गैरहजर राहिल्याचं खा संजय काकडे यांनी स्पष्ट केले आहे.  पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मंगळवारी पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे भूमिपूजन झाले. यावेळी शहरातील सर्व भाजप पदाधिकारी, आमदार खासदार उपस्थित होते. परंतु सहयोगी खा. संजय काकडे हे गैरहजर राहिले होते.

पुण्याचा भावी खासदार कोण या विषयावर आज वाडेश्वर कट्यावर चर्चा भरवण्यात आली होती. यावेळी बोलताना काकडे म्हणाले की, मी आजवर तब्बल भाजपचे जवळपास दीड लाख सभासद बनवले आहेत, माझे मेरिट पाहता पक्ष मला संधी देईल.

Loading...

वेगवेगळ्या कारणांनी कायम चर्चेत राहणारे भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे 2019 मध्ये पुणे लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा निर्धार केलेल्या काकडेंना भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी देखील उमेदवारीसाठी इतर पक्षातून चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे. दरम्यान, दस्तुरखुद्द पंतप्रधानांचा कार्यक्रम असतानाही काकडे गैरहजर राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले