आमदार संजय कदमांना धक्का, सश्रम कारावासाची शिक्षा कायम

रत्नागिरी : 2005 सालच्या तोडफोड आणि आणि शासकीय कामात अडथळा प्रकरणी खेड दिवाणी न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावास आणि दंड अशी खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कदम यांना ठोठावली आहे. आता अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवली कदम यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

2005 साली मुसळधार पावसामुळे खेडमध्ये जगबुडी नदीचे पाणी घुसून करोडो रुपयांचे नुकसान झाले होते. व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी यासाठी संजय कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यावेळी कार्यकर्ते आणि प्रांताधिकारी श्री.गेडाम यांच्यासोबत बाचाबाची झाली होती.

हा प्रकार सुरु असतानाच संजय कदम यांनी त्यांना धक्काबुक्की करत खुर्ची फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता. यासंदर्भात श्री.गेडाम यांनी तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयात खटला सुरु होता.