Sanjay Jadhav। मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि युवा सेने प्रमुख आदित्य ठाकरे हे अधिक आक्रमक झालेलं महाराष्ट्राने पाहिलं. पण यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुलाखतीला सामोरे गेले. शिवसेना खासदार आणि सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली. मुलाखती दरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजपसह एकनाथ शिंदे व बंडखोर आमदारांवर भाष्य केले आहे. यावर आता रामदास कदम यांनी प्रतिक्रिया देत ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय.
उद्धव ठाकरे दुजाभाव करतात. मराठा नेत्यांना ते मोठं होऊ द्यायचं नाही. त्यांना संपवायचं आहे. नारायण राणे, एकनाथ शिंदे, रामदास कदम ही त्याची उदाहरणं आहेत. कुठल्याही मराठा नेत्याला ते मोठं होऊ देत नाहीत. गळचेपी केली जातेय, असे गंभीर आरोप रामदास कदम यांनी केले आहेत. “एवढे आमदार एकत्रितपणे पक्ष का सोडतात? एवढ्या खासदारांना आपण एकनाथ शिंदेंना पाठिंबा द्यावा, असा विचार का येतो? पक्ष फुटलाय. आतातरी उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण करायला हवं, असं कदम म्हणाले आहेत. यानंतर आता कदम यांच्या या टीकेला खासदार संजय जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.
याबाबत बोलताना संजय जाधव म्हणाले, रामदास कदम कालपर्यंत मराठा नव्हते का ? आताचं तुम्हाला मराठा आठवला का.? असे अनेक सवाल त्यांनी रामदास कदमांना केले आहेत. तर बाळासाहेब ठाकरेंनी कधीच जात पात पाहून राजकारण केलं नाही. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी अशी टिका करणं संस्कृतीला शोभतं का ? असेही सवाल त्यांनी केला आहे. तर एकनाथ शिंदेंनी पक्ष प्रमुख म्हटलं काय आणि नाही म्हटलं काय आम्हाला काही फरक पडत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Bhai Jagtap | तब लडे थे गोरोसे अब लडेंगे चोरोसे – भाई जगताप
- Chandrakant Khaire : रामदास कदमांना मराठा नेत्यांवरून समाजात तेढ निर्माण करायचाय, चंद्रकांत खैरेंच वक्तव्य!
- Ramdas Kadam : आदित्य ठाकरेंना स्वत:चं खातं राहिलं बाजूला इतरांची खाती सांभाळायची आहेत; रामदास कदमांचा गंभीर आरोप
- NCP on Shinde government | सत्तेसाठी लाचारी करणाऱ्यांना जनतेचे हाल दिसत नाहीत ; राष्ट्रवादीची शिंदे सरकारवर टीका
- Ramdas Kadam : उद्धव ठाकरे मराठा समाजाच्या लोकांना मोठं होऊ देत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<