Share

Sanjay Gaikwad | “प्रसाद लाड पाकिस्तानात जन्मले का? हे तपासावे लागेल”; संजय गायकवाड यांची संतप्त प्रतिक्रिया

Sanjay Gaikwad | बुलढाणा : इतिहास आणि त्याबद्दल नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या विधानानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच आता भाजपच्या आणखी एका नेत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मासदंर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचं वक्तव्य प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलं आहे.

प्रसाद लाड यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी प्रसाद लाड यांच्यावर टीका केली आहे. प्रसाद लाड हे पाकिस्तान जन्माला आले का? हे तपासावे लागेल, अशा शब्दात संजय गायकवाड यांनी प्रसाद लाड यांना सुनावलं आहे.

तसेच रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकरी शब्दात उल्लेख केल्याने संजय गायकवाड हे आक्रमक झाले असून त्यांनी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा देखील समाचार घेतला आहे. बापाच्या नावाचाही एकेरी शब्दात उल्लेख करता का?”, असा सवाल आमदार गायकवाड यांनी रावसाहेब दानवे यांना केला आहे.

काय म्हणाले होते प्रसाद लाड ?

“हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली”, असं प्रसाद लाड म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Gaikwad | बुलढाणा : इतिहास आणि त्याबद्दल नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. राज्यपाल भगतसिंह …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now