Share

Sanjay Gaikwad | “…तर आयुष्यभर उद्धव ठाकरेंचे पाय चेपू”, संजय गायकवड यांचं ओपन चॅलेंज

Sanjay Gaikwad | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गुवाहाटीला कमाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गेले आहेत. याचपार्श्वभूमीवर शनिवारी बुलढाण्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सभेमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर जोरदार टीका केली होती. यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी उद्धव ठाकरे यांना जाहीर आव्हान दिलं आहे.

पहिली गोष्ट तर शेतकऱ्यांचा मेळावा म्हणून त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं. पण जेवढ्या लोकांनी तिथे भाषण केलं, त्यातलं कुणीही शेतकऱ्यांविषयी बोललं नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा, दु:ख, अडचणी किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनानं काय करावं, यावर विरोधी पक्ष म्हणून ते काहीही बोलू शकले नाहीत. जे बोलले, त्यात खोके, बोके याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठला विषयच नव्हता. त्यामुळे त्या शेतकरी मेळाव्यातून काही निष्पन्न झालं असं काही दिसलं नाही, असं संजय गायकवाड म्हणाले.

दरम्यान, काही जण ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. त्यांना रेडे मी म्हटलेलं नाही. त्यांच्याच मंत्रीमंडळातील एका मंत्र्याने आमचे ४० रेडे तिकडे गेल्याचं म्हटलं होतं. “तुम्हा सर्वांच्या साक्षीने या ४० रेड्यांनी, गद्दारांनी त्यांच्यात मर्दानगी शिल्लक असेल, तर जाहीर सांगावं की, ते भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.

तसेच, हे सरकार आश्वासनांची खैरात करणारं आहे, पण प्रत्यक्षात कोणाच्याच पदरात काहीच पडणार नसल्याचे, सांगायला ते विसरले नसल्याचं ठाकरे म्हणाले. तसेच, गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री स्वतःचा हात दाखवायला गेले होते. आज ते कामाख्या देवीचा नवस फेडायला गेले आहेत. ज्यांना स्वतःचे भविष्य माहित नाही, ते आपलं काय भविष्य ठरविणार, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Gaikwad | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गुवाहाटीला कमाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गेले आहेत. याचपार्श्वभूमीवर शनिवारी बुलढाण्यात उद्धव …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now