Share

Sanjay Gaikwad | “संजय राऊत फाटक्या तोंडाचे”; संजय गायकवाड यांची सडकून टीका  

Sanjay Gaikwad | बुलढाणा : गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात वाद पेटलेला आहे. हा वाद इतका टोकाला गेला की आमदार गायकवाडांनी एकदा बोलता बोलता राऊतांना शिवीगाळही केली आहे. आता पुन्हा एकदा संजय गायकवाडांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे.

ते म्हणाले, “संजय राऊत फाटक्या तोंडाचे आहेत. हिंदू धर्मात जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा पाचव्या दिवशी बाळाच्या तोंडात गोड मधाचं बोट फिरवलं जातं. हे लेकरू आयुष्यभर गोड बोलावं असा त्यामागे हेतू असतो. पण मला वाटतं संजय राऊत यांच्या मातोश्री नेमकं हे विसरल्या. त्यामुळे संजय राऊतांची जीभ सारखी फडफड करते आणि ते बेताल वक्तव्य करत असतात,” असं म्हणत गायकवाडांनी राऊतांना टोला लगावला.

“आमच्यावर गद्दारी केल्याचा आरोप नव्हे तर आम्ही उठाव-क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पुढच्या पिढ्यांना वाटणार आहे. त्यामुळे  संजय राऊत तू यापुढे अशी भाषा वापरू नको. राहिला प्रश्न आम्ही लढायचं की पडायचं, तर आमचा निर्णय जनतेला मान्य आहे. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली हातमिळवणी जनतेला मान्य नाही. शिवसेना-भाजपा म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं”, असा टोलाही संजय गायकवाड यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

शिंदे गटातील आमदारांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. दिवार चित्रपटात अमिताभच्या हातावर होते, मेरा बाप चोर है. तशे यांचे नातेवाईक, यांचे पोर, यांच्या बायका, हे म्हणतील, लोक म्हणतील हे गद्दार आहेत. यांच्या कपाळावर शिक्का गद्दारीचा शिक्का बसला आहे. यांच्या पिढ्यांना गद्दारी शांतपणे जगू देणार नाही,” असे संजय राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली. त्यांनी राऊतांना थेट शिवी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Gaikwad | बुलढाणा : गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now