‘देशद्रोही’ *#$# … वारीस पठाणांना उत्तर देताना संजय गायकवाडांचीच जीभ घसरली

बुलडाणा : एमआयएमचे नेते वारीस पठाण यांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभरातून आक्रमक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. वरीस पठाण यांच्या या विधानावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे, पण हे प्रत्युत्तर देताना त्यांचीच जीभ घसरली आहे. मलकापूर तालुक्यातील जांभूळ धाबा येथील शिवजयंतीच्या कार्यक्रमात शनिवारी 22 फेब्रुवारी रोजी वादग्रस्त विधान केले आहे.

न्यूज 18 लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे. यावेळी बोलताना गायकवाड यांनी वारीस पठाण यांच्याबद्दल ‘देशद्रोही लांड्या’ असे आक्षेपार्ह भाष्य केलं आहे. तसंच ‘आतापर्यंत तुम्ही तुमच्या बायका घरात ठेवल्या. त्या बायकांना गुलाम बनवून ठेवलं. त्यांना कधी बाहेर येऊ दिले नाही. त्यांना सांगितलं गेलं की मिलेट्री येणार, तुम्हाला घरातून बाहेर काढणार, तुम्हाला देशाबाहेर हकलणार, असं खोटं सांगून बाहेर आणलं. आता त्याने सांगितलं 15 कोटी मुसलमान 100 कोटी हिंदूवर भारी पडतील असाच बोलला ना. पण तू विसरलात वारीस पठाण शिवरायांचा मावळा तुझ्या लाखाची फौज असेल तर 500 मावळे तुझ्या लाखाच्या फौजेला चीत पाडायचे हे तू विसरला आणि आजही शिवरायांची जमात या राज्यात जिवंत आहे,’ असं आक्रमक प्रत्युत्तर दिलं आहे.

Loading...

आमदार संजय गायकवाड यांनी वारीस पठाण यांना थेट आव्हान दिलं आहे. तू 15 कोटीची गोष्ट काय करतो. मी सोमवारी तुला विधानसभेत भेटतो. असेल तिथं दाखव मला 15 कोटीची काय गोष्ट करतो, उभा नाही फाडला तर संजय गायकवाड एका बापाची औलाद नाही. तसेच तुझी जशी जीभ चालते तशी आमची तलवार चालते,’ असे विधान त्यांनी केलं आहे. दरम्यान, गायकवाड यांच्या या वादग्रस्त विधानाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यांच्यावरही चहुबाजूने टीका होताना दिसत आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका