रासपला मिळणार नवसंजीवनी; बॉलीवूडचा ‘हा’ रांगडा अभिनेता करणार पक्षात प्रवेश

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मंडळी राजकीय पक्षात प्रवेश करीत आहेत. भाजपमध्ये मेगाभरती सुरु असून त्यापाठोपाठ सेनेत प्रवेश करण्यासाठी देखील अनेकजण इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. एका बाजूला मोठ्याप्रमाणावर या घडामोडी घडत असताना आज मुंबईत झालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या महामेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

सिने अभिनेता संजय दत्त राजकारणात पुनरागमन करत असून तो येत्या पंचवीस सप्टेंबर रोजी राष्ट्रीय समाज पक्ष- रासपमध्ये प्रवेश करणार आहे. महादेव जानकर यांनी मुंबईत याची माहिती दिली. रासपला गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत अधिक जागा देण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. संजय दत्तनं सुमारे दशकभरापुर्वी समाजवादी पक्षातर्फे उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवली होती.

‘अभिनेता संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार होता. पण तारीखेत झालेल्या गोंधळामुळे तूर्तास त्यांचा प्रवेश झाला नाही. पण लवकरच ते रासपमध्ये येतील,’ असा धक्कादायक गौप्यस्फोट महादेव जानकर यांनी केला आहे.

‘तारीख चुकली आणि संजय दत्त यांचा प्रवेश पुढे ढकलला गेला आहे. पक्षप्रवेशासाठी संजय दत्त यांना 25 ऑगस्ट तारीख मागितली होती पण त्यांनी चुकून 25 सप्टेंबर तारीख नोंद केली. त्यामुळे ते आज परदेशात आहे. पण पुढच्या काळात ते पक्षात प्रवेश करतील,’ असा दावा महादेव जानकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या