आदित्य ठाकरेंना ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने दिला पाठिंबा

blank

टीम महाराष्ट्र देशा:- बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय दत्तने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. यात “आदित्यला माझ्या शुभेच्छा. येत्या विधानसभेला तो मोठ्या मतधिक्याने जिंकेल” असा विश्वासही संजय दत्तने व्यक्त केला आहे .

संजय दत्त याने , आपल्या देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज आहे, असं सांगत संजय दत्तने आदित्य ठाकरेंची पाठराखण केली आहे. त्याने आदित्य ठाकरेंना भरभरून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, येत्या 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीत आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्याला मोठ्या प्रमाणात मतदान करा, असे आवाहन संजय दत्तने केलं आहे.

महत्वाच्या बातम्या