यामुळे संजय दत्तला लवकर जेलमधून सोडल

राज्य सरकारचा न्यायलयात प्रतिज्ञापत्र

१९९३ साखळी बॉम्बस्फोटातील दोषी असणारा बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच त्याची  सुटका का करण्यात आली, याचे स्पष्टीकरण देण्यास उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानुसार राज्य सरकारने आज न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.

संजय दत्तने जेलमध्ये असताना चांगली वर्तणुक दाखवल्यामुळे त्याची शिक्षा कमी करण्यात आल्याच प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केले आहे. ‘संजय दत्त बाबतीत कोणत्याही नियमांचं उल्लंघंन झाले नसून, त्याला जेलमध्ये दिलेली कामे त्याने वेळेत पूर्ण केलीत. तसेच त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे त्याची शिक्षा कमी करण्यात आली होती’.

bagdure

राज्य सरकारच्या या स्पष्टीकरणाला सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी विरोध केला आहे. संजय दत्तने कोणती कामे वेळेत पूर्ण केली आहेत. त्याची कोणती चांगली वागणूक होती? ज्यामुळे त्याची शिक्षा कमी केली असा सवाल करत राज्य सरकारच्या स्पष्टीकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

संजय दत्तची अशी कोणती चांगली वागणूक आहे ते न्यायालयाला तरी कळू द्या असा सवाल विचारुन न्यायालयाने देखील राज्य सरकार आणि जेल प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत दोन आठवड्यांनी पुढील सुनावणी ठेवली आहे.

You might also like
Comments
Loading...