संजय बर्वे यांनी स्वीकारली मुंबई पोलीस आयुक्तपदाची सूत्रे

मुंबई : राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांनी आज मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. पोलीस आयुक्त सुबोध कुमार जायसवाल यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली.

यावेळी सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार,सहपोलीस आयुक्त (प्रशासन) संतोष रस्तोगी आदी उपस्थित होते. पोलीस आयुक्त जायसवाल यांची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या पदाची सूत्रे श्री. बर्वे यांच्याकडे देण्यात आली.

Loading...

बर्वे हे 1987 च्या बॅचचे अधिकारी असून यापूर्वी ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागात महासंचालक पदावर होते. त्यांची पहिली नियुक्ती ही नागपूर पोलीस आयुक्तालयात सहायक पोलीस आयुक्त या पदावर झाली. त्यानंतर त्यांनी मुंबई पोलीस दलात पोलीस उपायुक्त म्हणून तसेच अपर पोलीस महासंचालक प्रशासन, लोहमार्ग, राज्य गुप्तचर विभाग आदी ठिकाणी सेवा बजावली असून राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस महानिरीक्षक पदावर काम केले आहे. तसेच वर्धा येथे पोलीस अधीक्षक व सोलापूर येथे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार