fbpx

सानिया मिर्झाच्या नवऱ्यानं हातानं चव घालवली; जगभरात व्हीडीओ व्हायरल

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक सोशल मिडीयावर चांगलाच ट्रोल होत आहे. त्याने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात अजब पद्धतीने विकेट गमावत स्वतःच हसू करून घेतले आहे.

सामन्याच्या ४७ व्या षटकात मार्क वूडच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात शोएब हिटविकेट झाला. त्याने बॅटने चेंडू टोलवण्याऐवजी चक्क स्टम्प्स उडवले. त्याच्या या बाद होण्यावर जल्लोष करावा की पोट भरून हसावे, हेच वूडला कळेनासे झाले. सोशल मीडियावर मात्र मलिकवर जोक्स फिरू लागले आहेत.

दरम्यान, शोएब मलिक हा भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती आहे. तसेच सध्याच्या पाकिस्तानचा संघातील सर्वात अनुभवी फलंदाज आहे.