अस्मिता योजनेअंतर्गत ग्रामीण महिलांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन

मुंबई : ग्रामीण भागात तरुणींमध्ये मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत जागृती व्हावी यासाठी मंत्रिमंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तरुणींना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. या आधी अक्षयकुमारचा ‘पॅडमॅन’ चित्रपट करमुक्त व्हावा म्हणून मागणी होत होती. त्यावर ‘पॅडमॅन’ पेक्षा सॅनिटरी नॅपकिन करमुक्त व्हावी या मागणीने जोर धरला होता.

राज्याच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या महिला आणि किशोरवयीन मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छतेबाबत जाणिवा विकसित व्हाव्यात, यासाठी त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या उपक्रमाला ‘अस्मिता योजना’ असं नाव देण्यात आलं आहे.अक्षयकुमारची मुख्य भूमिका असलेला पॅडमॅन हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. ग्रामीण महिलांना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन देण्यासाठी झटणाऱ्या अरुणाचल मुरुगंथम यांची कहाणी या सिनेमात पाहायला मिळणार आहे. तरुणींमध्ये मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत जागृती व्हावी म्हणून सरकारने घेतलेला निर्णय ग्रामीण भागातील तरुणींसाठी महत्वपूर्ण आहे.

You might also like
Comments
Loading...