सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणारी अस्मिता योजना

sanitari napkin

वेबटीम : GST मुळे  सॅनिटरी नॅपकिनची किंमत वाढल्यामुळे महिलावर्गात मोठ्याप्रमाणावर नाराजी वाढत असताना शाळकरी मुलींसाठी मात्र अवघ्या पाच रुपयात राज्य सरकार आठ सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणार आहे.

आर्थिक कारणामुळे मुलींसाठी सॅनिटरी पॅड घेणे शक्य होत नाही तसेच मासिक पाळीतील अस्वच्छतेच्या अडचणींमुळे विद्यार्थिनींचे शाळा सोडण्याचे प्रमाण २३ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहचले आहे.या सामाजिक समस्येचे भान ठेऊन, राज्य सरकारच्या महिला व बालविकास खात्यातर्फे शाळकरी मुलींसाठी अवघ्या पाच रुपयात आठ सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणारी अस्मिता योजना येत्या १५ ऑगस्टपासून सुरू करण्यात येईल, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
स्थानिक महिला बचत गटांच्या मदतीने शाळा किंवा घराजवळ हे पॅड ऊपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे श्रीमती मुंडे यांनी सांगितले. त्यामुळे लवकर शाळकरी मुलींना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होतील अशी आशा आहे.