सानया नेहवाल जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत

नानजिंग (चीन) : भारताची स्टार महिला बॅटमिंटनपटू सानया नेहवालने आपला विजयी धडाका कायम राखला आहे. थायलंडच्या रॅटचानोक इन्टॅनॉनला पराभूत करत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. सायनाने रॅटचानोकला 21-16, 21-19 असे पराभूत केले.

पहिल्या गेममध्ये दोघींमध्ये 5-5 अशी बरोबरी पाहायला मिळाली. पण त्यानतर मात्र सायनाने सामन्यात आघाडी मिळवायला सुरुवात केली. त्यानंतर 10-8 आणि त्यानंतर 14-10 अशी आघाडी सायनाने घेतली होती. ही दमदार आघाडी सायनाने कायम ठेवली आणि पहिला गेम 21-16 असा जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये मात्र रॅटचानोकने सायनाला कडवी झुंज दिली. दुसऱ्या गेमच्या अखेरपर्यंत तिने सायनाला चांगलेच झुंजवले, पण दुसरा गेम मात्र तिला जिंकता आला नाही. दुसऱ्या गेममध्ये दोघींची 19-19 अशी बरोबरी झाली होती. पण त्यानंतर सायनाने सलग दोन गुण पटकावत गेमसह सामनाही जिंकला.

शहरी भागातील भारनियमन मागे, तर ग्रामीण भागातील कायम