सानिया मिर्झा उद्या मँचेस्टर मैदानावर राहणार उपस्थित, कुणाला करणार सपोर्ट ?

blank

टीम महाराष्ट्र देशा : विश्वचषकातील सर्वात लक्षवेधी आणि रोमांचक असा भारत वि. पाकिस्तान सामना उद्या होणार आहे. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर हा महामुकाबला होणार आहे. या सामन्याची मजा घेण्यासाठी भारत, पाकिस्तान, अमेरिका, अशा अनेक देशातून चाहत्यांनी इंग्लंडच्या मँचेस्टर शहरात हजेरी लावली आहे. तर भारताची लेक आणि पाकिस्तानची सून टेनिस पटू सानिया मिर्झा ही आपल्या लहनग्या इजहानसह मँचेस्टर शहरात दाखल झाली असून ती उद्याच्या भारत पाकिस्तान सामन्याची मजा लुटणार आहे.

सानिया हा सामना पाहाण्यासाठी मैदानात उपस्थित राहाणार असल्याने ती भारताला सपोर्ट करणार की, पाकिस्तानला हे पाहाणं खरंच उत्सुकतेचं ठरणार आहे. कारण सानिया भारताची लेक असली तरी ती सध्या पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक याची पत्नी आहे आणि विशेष म्हणजे शोएब मलिक हा पाकिस्तानच्या संघातून विश्वचषक खेळत आहे. त्यामुळे सानिया मिर्झा आता कुणाला सपोर्ट करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी सानिया ने भारत-पाकिस्तान विश्वचषकाच्या सामन्याच्या जाहिरातीवरून संतप्त प्रतिक्रया दिली होती. स्टार स्पोर्ट्स वाहिनीनं केलेली ‘अब्बू’ ही जाहिरात आणि त्यावर पाकिस्तानने केलेली विंग कमांडर अभिनंदनची जाहिरात यावरून नेटकरी मंडळींमध्ये शाब्दिक युद्ध  पेटले आहे. तर यावर सानिया मिर्झा हिने संताप व्यक्त केला होता.

सानिया हिने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून याबाबत संताप व्यक्त केला आहे. ती म्हणाली की, ‘दोन्ही देशांमध्ये अशा द्वेश निर्माण करणाऱ्या जाहिराती तयार करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या जाहिरातींची खरचं आवश्यकता नाही. मुर्खपणाचा बाजार मांडला आहे. हा केवळ क्रिकेट सामना आहे आणि त्याची दोन्ही देशांतील चाहत्यांमध्ये चांगली उत्सुकता आहे.