सानिया मिर्झा भारताची पाकिस्तानमधील गुप्तहेर ?

‘राझी’चा ट्रेलर: सिनेमा आलियाचा ट्रोल झाली सानिया मिर्झा

टीम महाराष्ट्र देशा- भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा सध्या आलिया भट्टच्या राझी सिनेमामुळे ट्रोल होत आहे. आलिया भट्टच्या ‘राझी’ सिनेमाची कथा एक अशा भारतीय मुलीची आहे जिचे पाकिस्तानी मुलाशी लग्न होते. पण तरीही ती भारतासाठी गुप्तहेर म्हणून काम करते अशी आहे. या स्टोरीचा संबंध नेटिझन्सनी टेनिस स्टार सानिया मिर्झा हिच्याशी जोडला असून त्यामुळे सानिया मिर्झाबद्दल भारत आणि पाकिस्तानमधील नेटिझन्समध्ये ट्वीटर वर युद्ध सुरु झाले आहे. ‘बॉलीवूड गांडू’ या मनोरंजन विश्वातील बातम्या देणाऱ्या वेबसाईट ने सानिया मिर्झाला यासंदर्भातील एक ट्वीट केलं होत ज्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला.

 

राझी सिनेमात आलिया एका काश्मिरी मुस्लिम मुलीची भूमिका साकारत आहे, जिचे लग्न एका पाकिस्तानी मुलासोबत होते. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अशी अफवा पसरत होती की, राझी सिनेमाची कहाणी सानिया मिर्झाच्या आयुष्यावर बेतलेली आहे. यावर सानियाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन उत्तर देखील दिले आहे. मात्र तरीही नेटिझन्स काही केल्या ते मान्य करायला तयार नाहीत.

bagdure

दरम्यान दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या ‘राझी’ या नव्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात आलिया भट्टने गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. आलियाचा अफलातून अभिनय ट्रेलरमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतो. गुप्तहेराच्या (स्पाय) आयुष्यावर आधारित हा सिनेमा असल्याचे ट्रेलर पाहून लक्षात येते. जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रॉडक्शनने या सिनेमाची निर्मिती केली आहे. पुढील महिन्यात 11 मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

देशासाठी लढणाऱ्या सैनिकांचा संपूर्ण देशाला सार्थ अभिमान असतो. पण जे स्वतःची ओळख लपवून देशासाठी काम करतात त्यांच्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांना काहीच माहित नसते. राझी सिनेमातून अशा असामान्य कतृत्व दाखवण्याच प्रयत्न करण्यात आला आहे. ‘फिलहाल’ आणि ‘तलवार’ सिनेमांचे दिग्दर्शन केलेल्या मेघना गुलझारने या सिनेमाच्या दिग्दर्शन केले आहे.

हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या कादंबरीवर राझी सिनेमाची गोष्ट आहे. या सिनेमाची गोष्ट सत्य घटनेवर आधारीत आहे. १९७१ मध्ये भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या वातावरणात ‘सहमत’ एका पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न करते. ट्रेलरमध्ये आलियाचे एक आज्ञाधारक मुलगी, कुटुंबवत्सल पत्नी आणि निर्भीड गुप्तहेर असे वेगवेगळे पैलू पाहायला मिळतात. तर विक्की कौशलही त्याच्या व्यक्तिरेखेमध्ये खुलून दिसतो.

राझी ट्रेलर

You might also like
Comments
Loading...