भारत – पाकिस्तान क्रिकेटच्या जाहिरातीवरून सानिया मिर्झा आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा : येत्या १६ तारखेला विश्वचषकातील भारत – पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना होणार आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सामन्याची जबरदस्त जाहिरात केली जात आहे. मात्र दोन्ही देशांनी जाहिरातीमध्ये पातळी सोडल्याचं दिसत आहे. स्टार स्पोर्ट्स वाहीनीनं केलेली ‘अब्बू’ ही जाहिरात आणि त्यावर पाकिस्तानने केलेली विंग कमांडर अभिनंदनची जाहिरात यावरून नेटकरी मंडळींमध्ये शाब्दिक युद्ध होत आहे. तर यावर भारताची टेनिसपटू आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक याची पत्नी सानिया मिर्झा हिने संताप व्यक्त केला आहे.

सानिया हिने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून याबाबत संताप व्यक्त केला आहे. ती म्हणाली की, ‘दोन्ही देशांमध्ये अशा द्वेश निर्माण करणाऱ्या जाहिराती तयार करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या जाहिरातींची खरचं आवश्यकता नाही. मुर्खपणाचा बाजार मांडला आहे. हा केवळ क्रिकेट सामना आहे आणि त्याची दोन्ही देशांतील चाहत्यांमध्ये चांगली उत्सुकता आहे.

Loading...

 

दरम्यान पाकिस्तान ने पातळी सोडणारी जाहिरात तयार केली आहे. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानी हवाई दलासोबत झालेल्या चकमकीदरम्यान पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांचा वापर जाहिरातीत करण्यात आला आहे.या जाहिरातीमध्ये पाकिस्तानच्या तावडीत सापडलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याची भूमिका करणारा एक व्यक्ती आहे. तो व्यक्ती विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना टाळाटाळ करत आहे. तसेच व्यक्ती चहा पिताना दाखवण्यात आली आहे.यानंतर जाहिरातीमधील अभिनंदन यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला तिथून जाण्यास सांगितलं जातं. ती व्यक्ती चहाचा कप घेऊन तिथून जाऊ लागते. तितक्यात त्या व्यक्तीला कप घेऊन कुठे चाललास, असा प्रश्न विचारण्यात येतो. या ठिकाणी चहाच्या कपचा आधार घेत वर्ल्डकपवर भाष्य करण्यात आलं आहे.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील