विश्वजित कदमांचा मार्ग सुकर ; भाजप उमेदवाराचा अर्ज मागे

सांगली : पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून येत्या २८ मे रोजी मतदान होणारआहे. ३१ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम हे रिंगणात आहेत.

दरम्यान याठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने विश्वजित कदम यांना पाठींबा दिला आहे तर शिवसेनेने सुद्धा पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूकीत आपला उमेदवार दिलेला नाही त्यामुळे विश्वजित कदम यांचा आमदार होण्याचा मार्ग आता आणखीनच सुकर झाला आहे.

You might also like
Comments
Loading...