मुख्यमंत्र्याचं गृहखाते जनआंदोलने दडपवण्याचं काम करते- संग्राम कोते

औरंगाबाद/प्रतिनिधी : राज्यात विविध प्रश्नासाठी युवक काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेले मार्चे, आंदोलने या सरकारकडून दडपवण्यात आली आहे. राज्याचे गृह खात्याकडून अशा प्रकारचे काम केल्या जात असल्यचा आरापे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी केला आहे. युवक काँग्रेसच्या वतीने राज्यातील सर्व मतदार संघात 1 बुथ 15 युथ ही संकल्पना घेऊन आगामी निवडणुकीची तयारी करत आहे. कोते यांनी शुक्रवारी औरंगाबाद जिल्ह्याच्या आढावा घेतला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजप सरकारच्या काळात विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी विविध जिल्ह्यात युवक काँग्रेसच्य वतीने आंदोंलने करण्यात आली. गृह खात्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यानी अनेकदा ही आंदोलने दडपवण्यासाठी पोलिस प्रशासनाचा वापर केल्याचा आरोप कोते यांनी केला आहे. प्रशासकीय यंत्रनेतील मोठे अधिकारीही भाजपाचे कार्यकर्ते म्हणून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

युवक काँग्रेसकडून 91 हजार बुथची मार्चेबांधणी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस राज्यातील 91 हजार बुथ सक्षम करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष कोते राज्याच्या दौऱ्यावर आहेत. प्रत्येक बूथवर 15 कार्यकर्ते नेमूण पक्षाचा विचार पोहचवण्याचे काम करणारी यंत्रणा उभी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या 30 जुलै पर्यत राज्यातील 200 मतदारसंघात हे काम पूर्ण होणार असून उर्वरित काम लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर व ग्रामीण चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

You might also like
Comments
Loading...