संग्राम जगतापांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना नगरकरांचा तुफान प्रतिसाद

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज शेतकरी पती-पत्नीच्या हस्ते दाखल केला. जवळा (ता. पारनेर) येथील शेतकरी बबनराव रासकर व त्यांच्या पत्नी अंजना रासकर या शेतकरी दाम्पत्याच्या हस्ते जगताप यांनी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जगताप यांनी शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी आनंदऋषी महाराजांच्या समाधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. जुन्या बसस्थानक चौकातून त्यांची महारॅली जिल्हाधिकारी कार्यालयात पोचणार आहे. या महारॅलीला नगरकरांचा तुफान प्रतिसाद पाहायला मिळाला. दरम्यान, भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना असचं शक्तीप्रदर्शन केल होत. त्यामुळे नगरची लढाईत ‘हम भी किसी से कम नही’ हेच संग्राम जगताप यांनी दाखून दिल आहे.