शेतकरी पती-पत्नीच्या हस्ते संग्राम जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल !

नगर – नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज शेतकरी पती-पत्नीच्या हस्ते दाखल केला.

जवळा (ता. पारनेर) येथील शेतकरी बबनराव रासकर व त्यांच्या पत्नी अंजना रासकर या शेतकरी दाम्पत्याच्या हस्ते जगताप यांनी अर्ज दाखल केला .

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जगताप यांनी शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी आनंदऋषी महाराजांच्या समाधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. जुन्या बसस्थानक चौकातून त्यांची महारॅली जिल्हाधिकारी कार्यालयात पोचणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचार रॅलीतून ते पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात येणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.

दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्‍लेरा ब्रूस हायस्कूलच्या मैदानात महासभेतून ते प्रचाराचा नारळ वाढवणार आहेत

2 Comments

Click here to post a comment