आ. संग्राम जगताप यांना केडगावमधील दूहेरी हत्याकांडाच्या दोषारोपपत्रातून वगळले

टिम महाराष्ट्र देशा /अहमदनगर : राज्यात गाजलेल्या केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातून आमदार संग्राम जगताप यांना वगळण्यात आले आहे. त्यांचा हत्याकांडात कुठेही पुरावा आढळून आला नाही. तसेच आ. अरुणकाका जगताप यांचाही या प्रकरणात सहभाग नसल्याचे स्पष्ठ झाल्याने आ. अरुण जगताप यांनाही दिलासा मिळाला आहे. या हत्याकांडातील इतर आठ जणांवर दोषारोपत्र दाखल करण्यात आले आहे.

महापालिका पोटनिवडणूक केडगाव प्रभाग क्रमांक 32 (ब) मधील निवडणूक निकालाच्या दिवशी 7 एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास शिवसेनेच उपशहर प्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर मुख्य आरोपी संदीप गुंजाळ हा स्वत;हून पारनेर पोलिस ठाण्यात हजर झाला होता. या हत्याकांड प्रकरणी मयत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम कोतकर यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात आ. संग्राम जगताप, आ. अरुण जगताप, आ. शिवाजी कर्डिले यांच्यासह 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात संदीप गुंजाळ, बी. एम.कोतकर, बाळासाहेब कोतकर, बाबासाहेब केदार, रवि खोलम, संदिप गिर्हे, नगरसेवक विशाल कोतकर, भानुदास कोतकर व आ. संग्राम जगताप अशा दहा जणांना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयानी कोठडीत आहेत. तर इतर आरोपी अद्याप फरार आहेत.

नगरमध्ये शिवसैनिकांवर गोळीबार; दोन ठार

उद्धव ठाकरेंनी केले कोतकर व ठुबे कुटुंबीयांचे सांत्वन

पावसाळी अधिवेशन मुंबई ऐवजी नागपूराला का ? धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल