fbpx

सासऱ्यांची गोची होण्याचा प्रश्नच नाही – संग्राम जगताप

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अहमदनगरमध्ये मोठं राजकीय घमासान पाहायला मिळत आहे. भाजपच्या सुजय विखेंविरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसने नगरचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संग्राम जगताप यांचे सासरे शिवाजी कर्डिले हे भाजपमध्ये आहेत. त्यामुळे ते कुणाचा प्रचार करणार याबाबत त्यांची गोची होत आहे असा प्रश्न उपस्थित होत होता.

मात्र, खरोखरच शिवाजी कर्डिले यांची गोची होत आहे का यावर बोलताना संग्राम जगताप यांनी ” शिवाजी कर्डिले यांचा पक्ष वेगळा आहे त्यामुळे त्यांची गोची होण्याचा प्रश्नच येत नाही” असं वक्तव्य केल आहे. ते कुठलीही निवडणूक लढवण्यास उत्सुक नव्हते, त्यामुळे त्यांची गोची होण्याचा प्रश्नच नाही असं ते म्हणाले. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.

तर दुसरीकडे शिवाजी कर्डिले यांनी माझा कोणताही नातेवाईक राष्ट्रवादीचा ऊमेदवार असला तरी मी भारतीय जनता पक्षाच्या ऊमेदवारा सोबतचं राहणार आहे असं यापूर्वीचं जाहीर करून टाकले आहे.

परंतु संग्राम जगताप यांचे वडील आमदार अरुणकाका जगताप यांनी माझ्या संपर्कात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच नव्हे, तर भाजपचे नेते देखील संपर्कात आहेत असं वक्तव्य केलं आहे. हे नेते दुरसे तिसरे कोणी नसून शिवाजी कर्डिले हे असतील यात तिळमात्र शंका नाही. यामुळे शिवाजी कर्डिले आपल्यालाच मदत करणार असल्याचा विश्वास अरुणकाकांनी व्यक्त केला आहे.