fbpx

शिवेंद्रराजे, संग्राम जगताप पक्ष सोडणार नाहीत : शरद पवार

sharad pawar

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. आघाडीतील बरेच नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तसेच इतरही अनेक नेते पक्षांतराच्या तयारीत आहेत.

अशातच पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी शिवेंद्रराजे, संग्राम जगताप पक्ष सोडणार नाहीत अस विधान केले आहे. तसेच भाजप आणि सेनेकडून लोकप्रतिनिधींना धमकावण्याचा सरकारचा प्रयत्न होत असल्याचही शरद पवार म्हणाले.

दरम्यान, नगरचे आमदार संग्राम जगताप हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. तर शिवेंद्रराजे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. परंतु आता या सर्व चर्चांना खुद्द पवार यांनी पूर्णविराम दिला आहे.